मर्सरचे कॉस्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेक्षण
मुंबई : स्वप्नांचे शहर म्हणून मुंबईला (Mumbai City) ओळखले जाते.मुंबईत रोज अनेक लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. गाव-खेड्यातून, परदेशातून मुंबईत लोक पोटाची खळगी भरायला येतात. तर अनेकजण शिकण्यासाठी येतात. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखले जाते. हेच शहर परदेशी नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वाधिक महाग शहर असल्याचे समोर आले आहे.
मुंबई १३६ क्रमाकांवर
मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्वेक्षणानुसार, वैयक्तिक सुविधा, गरजा, वाहतूक, घरभाडे, जेवणाचा खर्च याबाबतीत मुंबई महाग आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत या सर्व गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. तर जागतिक पातळीवर हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर आहे सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई १३६ क्रमाकांवर आहे.
मागच्या वर्षी मुंबई १४७ क्रमांकावर होती. तर दिल्ली १६४ क्रमांकावर आहे. चेन्नई १८९ स्थानावर तर बंगळुरु १९५ क्रमांकावर आहे. हैदराबाद २०२ क्रमांकावर तर पुणे २०५ क्रमाकांवर आहे. मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर आहे. ‘मुंबई जरी रँकिंगमध्ये महाग शहर असले तरीही मुंबईत राहणे परवडणारे आहे.
देशांतर्गत असलेली वस्तूंची मागणी तसेच सेवा या क्षेत्रामुळे भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे, जागतिक गृहनिर्माण खर्च आणि महागाई वाढल्याने राहणीमान सुधारणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई एक आकर्षक ठिकाण बनत आहे. त्यामुळेच कदाचित मुंबईत राहणे थोडे महागले असावे’, असे राहुल शर्मा, इंडियन मोबिलिटी लीटर मर्सर यांनी सांगितले आहे. दिल्लीतील घरभाड्यात वाढ झाली आहे.