Tuesday, April 29, 2025

महामुंबई

Mhada : म्हाडा लोकशाही दिन ८ जुलै रोजी प्रस्तावित

मुंबई : राज्यात दोन शिक्षक व दोन पदवीधर अशा एकूण चार विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) लोकशाही दिन सदर निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच आयोजित केला जाणार आहे. आगामी म्हाडा लोकशाही दिन (Mhada Democracy Day) ८ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

म्हाडा प्रशासनातर्फे नागरिकांना कळविण्यात आले की, 'म्हाडा'च्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.

आतापर्यंत म्हाडामध्ये तीन लोकशाही दिन घेण्यात आले असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु, एप्रिल ते जून या महिन्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानतर मुंबई पदवीधर, कोंकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ व नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने सदर आयोजनावर निर्बंध आहेत.

Comments
Add Comment