Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीMarine Drive : क्वीन नेकलेस मुंबईकरांच्या पर्यटनासाठी पुन्हा सज्ज!

Marine Drive : क्वीन नेकलेस मुंबईकरांच्या पर्यटनासाठी पुन्हा सज्ज!

१.०७ किलोमीटरचा पदपथ वापरासाठी पूर्ववत

मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरिन ड्राईव्हच्या (Marine Drive) राणीचा रत्नहार (क्वीन नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ वापरासाठी पूर्ववत करण्यात आला आहे.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपथाचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करता येईल.जी.डी.सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी सज्ज झाला आहे.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा १० जून रोजी खुला करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.त्यामुळे १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपुल ते मफतलाल क्लब सिग्नल दरम्यान वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा अंतराचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अस्तित्वातील फूटपाथचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील रस्ता माफत लाल सिग्नलपर्यंत असा सरासरी १ किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येईल. अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी ही बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजुला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱया समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे.

पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -