मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. एससी, एसटीला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचे आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.
बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. ओबीसी बांधवांनी बीडच्या तलवाडा फाटा परिसरात महामार्ग अडवला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या हाेत्या. आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवत रास्ता आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने राज्यभरातून लोक उपोषणस्थळी येत आहेत. नांदेड सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा आहे. हाके यांच्या आमरण उपोषणाला सातवा दिवस उलटन गेले आहेत. त्यातच त्यांची प्रकृती खालवली आहे.