Thursday, March 20, 2025
HomeमहामुंबईGCT : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे नरडाणा येथे गती शक्ती मल्टीमोडल कार्गो...

GCT : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे नरडाणा येथे गती शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई (Mumbai) विभागाने धुळ्याजवळ नरडाणा येथे नुकतेच पहिले गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल सुरु केले. शिरपूर पॉवर प्रा.लि.च्या सहकार्याने हे कार्गो टर्मिनल (Gati Shakti Cargo terminals) कार्यान्वित झाले. हे मुंबई विभागातील पहिले कार्गो टर्मिनल आहे. जिंदाल पॉवर लिमिटेडच्या धुळ्यातील पॉवर प्लांटची स्थापित क्षमता हि ३०० मेगावॅट आहे आणि टिपलर हाताळणी सुविधेसह ३ लाइन हाताळणी यार्डसह सुसज्ज आहे.

नरडाणाजवळ हे गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल सुरू झाल्यामुळे २. ०५ दशलक्ष टन लोडिंग आणि मालवाहतूक अंदाजे भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये दरवर्षी ३७४ कोटींची भर पडणार आहे. सध्याच्या रस्त्याने कोळशाच्या वाहतुकीची जागा रेल्वेने घेतली जाईल, ज्यामुळे रेल्वे गुणांक आणखी वाढेल, वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक मार्ग उपलब्ध होईल आणि साल २०३० पर्यंत ‘मिशन ३ हजार मॅट्रिक टन साध्य करण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल .

अभिषेक पुढे म्हणाले की मुंबई विभागाच्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनामुळे या गती शक्ती टर्मिनल लवकर सुरू करणे शक्य झाले आहे. यासह,गती शक्ती टर्मिनलमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातून पहिली रेल्वे गाडी मिळाली जिच्यावर १६ जून रोजी माल भरण्यात आला आणि १८ जून रोजी नरडाणा येथील गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलवर ठेवण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -