Friday, July 5, 2024
HomeमहामुंबईSummer Special Trains : मध्य रेल्वे यंदा ९२० उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

Summer Special Trains : मध्य रेल्वे यंदा ९२० उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

१०.८९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी, नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त, उन्हाळी विशेष गाड्याही चालवत आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षी ९२० उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन केले असून त्याचा लाभ सुमारे १०.८९ लाख प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे. या विशेष गाड्या ज्यात पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीम नगर, मऊ, आगरतळा, आसनसोल, थिविम, कोचुवेली आणि इतर ठिकाणे या गाड्या धावल्या.

नियोजित ९२० उन्हाळी विशेष गाड्यांपैकी ३५३ ट्रेन सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहारसाठी, ८४ सेवा गोव्यासाठी, ३६ सेवा ईशान्येसाठी, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थान गंतव्यस्थानांसाठी आहेत. वरील राज्यांतून उन्हाळ्यातील प्रवासाची गर्दी लक्षात घेऊन , देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त ट्रेन्सचे नियोजन आणि चालवणे ही एक सतत प्रक्रिया आहे. विशिष्ट मार्गावर धावणाऱ्या गाड्या आणि या आवश्यकतेच्या आधारे, गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची संख्या वाढविली जाते. याशिवाय उन्हाळ्यात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे सक्रियपणे विविध उपाययोजना करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, नागपूर इत्यादी प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या टीमसह गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन प्रवाशांच्या योग्य मार्गदर्शनासाठी अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची तरतूद केली गेली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -