मुंबई: चेन्नईवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात मंगळवारी रात्री १०.२४ वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.
लँडिंगनंतर विमानाला आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले. येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. या विमानात १९६ प्रवासी आणि ७ सदस्य होते.
४१ विमानतळांना बॉम्बने उडवण्याची दिली होती धमकी
मंगळवारी रो सीएसएमआयएसह देशभरातील ४१ विमानतळांवर बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे ईमेल आले होते. दरम्यान, या धमक्या खोट्या निघाल्या. पीटीआयने मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार या धमक्यांमुळे विमान सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.
हॉस्पिटल्सना उडवण्याची धमकी खोटी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या तब्बल ६० रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांत बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यात खाजगी आणि सरकारही दोनही रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णालयांना ईमेल मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली आणि तपास करण्यात आला. ईमेल मध्ये म्हटले होते की बॉम्ब बेडच्या खाली आणि शौचालयांमध्ये ठेवण्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये तपास केला असता काही हाती लागले नाही.