Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीTrekking: पहिल्यांदा ट्रेकिंगला जात आहात का? जरूर फॉलो करा या टिप्स

Trekking: पहिल्यांदा ट्रेकिंगला जात आहात का? जरूर फॉलो करा या टिप्स

मुंबई: ट्रेकिंग एक मजेशीर आणि चांगला अनुभव आहे. मात्र पहिल्यांदा ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. या टिप्स तुमचा प्रवास अधिक सेफ आणि आनंददायक बनवू शकतात.

ट्रेकिंगची सुरूवात सकाळी लवकर करा. यामुळे दिवसा तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. तसेच रस्ताही नीट दिसेल. जर हवामान खराब असेल तर ट्रेकिंग करू नका.

ट्रेकिंगला जाण्याआधी नीट तयारी करा. आपल्या फिटनेस स्तरानुसार ट्रॅक निवडा. सुरूवातीला लहान आणि सोपे ट्रॅक निवडा. यामुळे जास्त त्रास होणार नाही.

ट्रेकिंगसाठी मजबूत आणि आरामशीर शूज निवडा. एक चांगली बॅग घ्या. ज्यात तुम्ही गरजेचे सामान भरू शकाल. हलके आणि आरामशीर कपडे घाला जे हवामानासोबत अनुकूल असतील.

ट्रेकिंगदरम्यान पुरेसे पाणी प्या. हलके तसेच पौष्टिक जेवण घ्या. जसे फळे, नट्स, एनर्जी बार्स. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल तसेच थकवा वाटणार नाही.

आपला ट्रेकिंग रूट नेहमी व्यवस्थित जाणून घ्या. आपल्या कुटुंबाला तसेच मित्रांना ट्रेकिंग प्लानबद्दल सांगा. ग्रुपमध्ये ट्रेकिंग करणे नेहमी सुरक्षित असते.

ट्रेकिंग करताना छोटी मेडिकल किट जरूर बाळगा. यात बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, पेनकिलर आणि इतर गरजेची औषधे ठेवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -