मुंबई: भारताचा क्रिकेटर शार्दूल ठाकूरची पत्नी मिताली पारूलकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. मिताली पारूलकरने बिझनेस केवळ सुरूच केला नाही तर त्याला हिटही बनवले.
शार्दूलची पत्नी मितालीला लहानपणापासूनच केक बनवण्याची खूप आवड आहे. तिने या आवडीचे रूपांतर बिझनेसमध्ये केले.
ऑल जॅझ बेकरी नावाने मितालीने ठाण्यामध्ये स्वत:ची बेकरी सुरू केली आहे. मिताली आणि शार्दूल हे शाळेपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
२०२३मध्ये शार्दूलने आपल्या लहानपणीच्या प्रेमाला पार्टनर बनवले होते. लक्झरी बेकरी बिझनेसने मितालीने २ ते ३ कोटी रूपयांची नेटवर्थ केली आहे. मिताली कॉमर्स स्टुडंट आहे. तिने बराच काळ नोकरी केल्यानंतर बिझनेस स्टार्ट केला.
बिझनेसवुमन असण्यासोबतच मिताली दिसायलाही खूप सुंदर आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर आपले फोटो टाकत असते.