Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीविधानसभेपूर्वी महायुतीत चाचपणी!

विधानसभेपूर्वी महायुतीत चाचपणी!

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजपा नेत्यांची मागणी?

मुंबई : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपाने महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती.

तरीही महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीचा धुव्वा उडवला. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद धूसफूसत असून, आरएसएसने केलेल्या जाहीर टीकेनंतर आता अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये नको, अशी मागणी सेना-भाजप नेते करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये ठेवण्याच्या बाबतीत पुनर्विचार करावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजप उमेदवारांना मिळाली नसल्याचा आरोप हे नेते करत आहेत.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जिथे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे सेना-भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे हे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आता महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय असे हे नेते म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “माढा, सोलापूर आणि दिंडोरीमध्ये आमच्या आमदारांनी काम केले आहे.”

या सर्व घडामोडीत अजित पवार यांच्या पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षात नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर भुजबळ यांनी पक्ष सोडला तर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसू शकतो.

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यांनी १३ जागी विजय मिळवला. यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी ९ जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघ्या १० जागा लढवत ८ जगांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागांवर यश मिळाले. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कसाबसा आपला गड कायम राखला. राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -