Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीParenting Tips: मुलांना बाहेरचे कधीपासून खायला द्यावे? जाणून घ्या ही गोष्ट

Parenting Tips: मुलांना बाहेरचे कधीपासून खायला द्यावे? जाणून घ्या ही गोष्ट

मुंबई: जसजशी मुले मोठी होतात तसतसे त्यांना पोषणतत्वांची गरज असते. मुलांच्या सुरवातीची दोन वर्षे त्या दरम्यान जे ही खायला दिले जाते त्यामुळे मुलांचा मेंदू तयार होतो. अशातच अनेक आयांना असा प्रश्न असतो की मुलांना सॉलिड फूड कधीपासून दिले गेले पाहिजे.

सहा महिन्यांपर्यंत मुलांची घ्या अशी काळजी

डब्लूएचओच्या मते मुले सहा महिन्यांची होईपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे. मुलांना गरजेची पोषणतत्वे आणि एनर्जी आईच्या दुधाने मिळते. जेव्हा मूल सहा महिन्यांचे होते तेव्हा त्यांना जास्त एनर्जी आणि पोषणतत्वांची गरज असते.

सहा महिन्यांच्या मुलांना काय खायला द्यावे?

जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याला काय खायला द्यावे? जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा तुम्ही त्याला डाळीचे पाणी, भाताची पेज द्यायला हरकत नाही. दरम्यान हे डाएट केवळ दिवसातून दोनदाच द्यावे. दरम्यान, याचे प्रमाण अधिक असायला नको.

बाळ आणखी थोडे मोठे म्हणजेच ८ ते १० महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला खिमटी, उकडलेल्या भाज्यांचा गर, पातळ पदार्थ द्यायला हरकत नाही. त्यासोबतच आईचे दूध सुरू ठेवावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -