Saturday, June 21, 2025

Airtelच्या ग्राहकांची मजा, आता या प्लानमध्ये ५६च्या जागी ७० दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी

Airtelच्या ग्राहकांची मजा, आता या प्लानमध्ये ५६च्या जागी ७० दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी

मुंबई: भारती एअरटेलने(airtel) आपल्या ३९५ रूपयांच्या प्लानच्या व्हॅलिडिटीला वाढवून आता ७० दिवस केले आहे. हा प्लान कंपनीने ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जाहीर केला होता. दरम्यान, या प्लानचे फायदे आधीसारखेच असणार आहेत.


कदाचित कंपनीच्या मते हा प्लान ग्राहकांना जास्त किंमतीमुळे आवडला नसावा. रिलायन्स जिओकडूनही ३९५रूपयांचा प्लान ऑफर केला जातो. दरम्यान यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही दिला जातो.


एअरटेलच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ६०० एसएमएस आणि ६ जीबी डेटा दिला जातो. मात्र अनलिमिटेड ५जी डेटा यात दिला जात नाही. आता कंपनीने प्लानची व्हॅलिडिटी वाढवून ५६ दिवसांवरून ७० दिवस केली आङे. म्हणजेच ग्राहकांना आता या प्लानमध्ये दोन आठवड्यांनी जास्त व्हॅलिडिटी मिळेल. दरम्यान, किंमत आधीचीच आहे. अशातच हा प्लान आता ग्राहकांसाठी स्वस्त झाला आहे.


दुसरीकडे जिओच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा ३९५ रूपयांचा प्लान पुढे हे. कारण यात एअरटेलच्या तुलनेत १४ दिवसांची अधिक व्हॅलिडिटी मिळते.

Comments
Add Comment