Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीAlka Yagnik : प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना अचानक आला बहिरेपणा!

Alka Yagnik : प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना अचानक आला बहिरेपणा!

विमानतळावर उतरल्या आणि दोन्ही कानांनी ऐकू येणंच बंद झालं…

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या गायिका अलका याग्निक (Singer Alka Yagnik) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अलका याग्निक यांना एका दुर्मिळ आजाराने ग्रासले असून त्यामुळे त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद झालं आहे. त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन (Social media handle) याबाबत माहिती दिली आहे.

अलका याग्निक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका विमान प्रवासातून मी बाहेर आले आणि मला काही ऐकू येईनासं झालं. या घटनेनंतर मी बरेच दिवस काही काम करताना दिसले नाही त्यामुळे माझी चौकशी करणाऱ्या माझ्या हितचिंतकांसमोर व चाहत्यांसमोर खूप हिंमत गोळा करुन मी अखेर मौन सोडत आहे. मला एक मेंदूचा दुर्मिळ आजार झाला असून सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केलं आहे. या अचानक झालेल्या मोठ्या आघाताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांनी म्हटलं आहे.

का बळावला हा आजार?

अलका याग्निक यांनी आपल्या पोस्टमध्ये या आजारामागील कारण देखील सांगितलं आहे. त्या म्हणतात, कानात सतत मोठ्याने आवाज ऐकल्यामुळे हा आजार बळावला. त्यामुळे चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी माझे आयुष्य पुन्हा व्यवस्थित करून लवकरच तुमच्याकडे परत येईन अशी आशा आहे. तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा या कठीण काळात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, अशा भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांनीदेखील अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -