Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीPushpa 2 movie : पुष्पाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! १५ ऑगस्टला रिलीज होणार...

Pushpa 2 movie : पुष्पाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! १५ ऑगस्टला रिलीज होणार नाही ‘पुष्पा २’

निर्मात्यांनी नेमका काय निर्णय घेतला?

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2 The Rule) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील नवं गाणं ‘द कपन साँग अंगारो’ तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. शिवाय टीझरमध्ये दाखवण्यात आलेला पुष्पाचा नवा अर्धनारी अवतार, भेदक नजर आणि श्रीवल्लीचाही नवा लूक यांमुळे ‘पुष्पा २’च्या बाबतीत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता मात्र आता रिलीज डेट थेट पाच महिन्यांनी पोस्टपोन करण्यात आली आहे.

‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट आता या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्याशिवाय, रिलीज पोस्टपोन करण्याचे कारणही सांगितले आहे.

का पोस्टपोन केली रिलीज डेट?

पुष्पाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले की, आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार. चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा. ‘पुष्पा २: द रुल’ आता ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या एडिटिंगचे काम काही प्रमाणात बाकी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.’पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -