मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनचा(amitabh bachchan) सिनेस्टार मुलगा अभिषेक बच्चनने मुंबईच्या एका मोठ्या अपार्टमेंट डील केली आहे. त्याने एकत्र ६ लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. मुंबईच्या पॉश परिरसर बोरिवलीमध्ये हे सर्व अपार्टमेंट अभिषेक बच्चनला १५.४२ कोटी रूपये पडले आहेत. अभिषेक बच्चनने हे अपार्टमेंट स्काय सिटीममध्ये खरेदी केले आहेत.
अपार्टमेंटसाठी ३१,४९८ रूपये प्रती स्क्वे फूट दिली किंमत
हे ६ अपार्टमेंट ४,८९४ स्क्वे फूटमध्ये पसरले आहेत. अभिषेक बच्चनने या अपार्टमेंटसाठी ३१,४९८ रूपये प्रति स्क्वे फूट किंमत दिली आहे. डॉक्युमेंटनुसार सेल अॅग्रीमेंटवर ५ मे २०२४ला साईन झाले होते. पहिला अपार्टमेंट १,१०१ स्क्वे फूटचा आहे. याची किंमत ३.४२ कोटी रूपये.
दुसरा आणि तिसरा अपार्टमेंट २५२ स्क्वे फूटचा आहे. या दोघांसाठी प्रत्येकी ७९ लाख रूपये दिले आहेत. चौथा अपार्टमेंट १,१०१ स्क्वे फूट आहे. याची किंमत ३.५२ कोटी रूपये आहे. पाचवा अपार्टमेंट १०९४ स्क्वे फूटचा आहे. याची किंमत ३.३९ कोटी रूपये आहे. ६व्या अपार्टमेंटची किंमत ३,३९ कोटी आहे.