Monday, June 16, 2025

Yavatmal Crime : गावातील काही कुटुंबांच्या घरी पाळणा हलत नाही म्हणून एका जोडप्याला बेदम मारहाण!

Yavatmal Crime : गावातील काही कुटुंबांच्या घरी पाळणा हलत नाही म्हणून एका जोडप्याला बेदम मारहाण!

समोर आलं याचं भयानक कारण


यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal News) बाभूळगाव (Babhulgaon) तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बाभूळगाव यावली येथे एका जोडप्यांनी जादुटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची माहिती उघडकीस आली आहे. मारहाणीत फिर्यादीचा डोळा फुटल्याने त्याला शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव तालुक्यातील यावली येथील काही कुटुंबाला मुल बाळ होत नाही. त्यामुळे गावातील प्रमोद वाकोडे आणि त्याच्या पत्नीने जादुटोणा केला, असा संशय गावकऱ्यांना आला होता. अशा प्रकरणामुळे संपूर्ण गाव अंधश्रद्धेचे बळी पडू नये, यासाठी गावातील प्रज्वल ठाकरे आणि इतर आठ लोकांनी प्रमोदच्या घरी जाऊन हा प्रकार रोखण्यासाठी त्याला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. मात्र या घटनेत प्रमोदच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रकरणी जखमी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून बाभूळगाव पोलिसांनी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा