
दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा
सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ
मुंबई : मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये केवळ ५.३८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.१ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरु आहे.
मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो.
पावसाची हुलकावणी, वाढलेला उष्मा आणि पाण्याची मागणी आणि तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाण्याची पातळी घटली आहे.मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. आज जलाशयात एकूण ७७८५१ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.