Thursday, July 10, 2025

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता आशियातील महाग शहरांच्या यादीत ३० व्या स्थानी पोहोचलेले शहर ठरले आहे. मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँग काँगने टॉप गाठले आहे.


या यादीत नवी दिल्ली १६४ व्या, चेन्नई १८९ व्या, बेंगळुरू १९५ व्या, हैदराबाद २०२ व्या, कोलकाता २०७ व्या व पुणे शहर २०५ व्या स्थानी आहे. स्वप्ननगरी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारी मुंबई शहर यंदाच्या यादीत तब्बल ११ क्रमांकांनी पुढे जात १३६ व्या स्थानी पोहोचले आहे. आशियामध्ये, मुंबई आणि नवी दिल्लीने क्रमवारीत वरची वाटचाल अनुभवली आहे.


दिल्ली, मुंबई व पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहणीमानाचा खर्च वाढण्यापाठी अनेक कारणे आहेत. या शहरांमधील रोजगार वाढल्याने मध्यमवर्गातील नागरिकांची खर्चाची क्षमता सुद्धा वाढली आहे. दुसरीकडे बहुतेक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असूनही, भारतीय रुपयाचे मूल्य हे तुलनेने स्थिर राहिले आहे परिणामी भारतीय शहरांमधील खर्चात तुलनेने कमी घट दिसून आली आहे.

Comments
Add Comment