
मुंबई: असे म्हटले जाते जेवण उकडणे हे ते फ्राय करण्याच्या तुलनेत चांगले असते. तुम्हाला ऐकून हैराण वाटेल मात्र काही पदार्थ तसेच भाज्या फ्राय करण्यापेक्षा त्या उकडल्याने त्यातील पौष्टिक गुण टिकून राहतात आणि शरीरास मिळतात.
बटाटा
बटाटा फ्राय करण्याऐवजी सालीसकट तो उकडून खाल्ल्यास अधिक फायदे होतात. कारण असे केल्याने त्यातील व्हिटामिन सी आणि बी नष्ट होत नाही आणि कॅलरीजचेही प्रमाणही कमी होतात.
रताळे
रताळे उकडून खाल्ल्याने त्यातील बीटा कॅरोटिन सुरक्षित राहते. हे एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरात जाऊन व्हिटामिन एमध्ये रुपांतरित होते. हे डोळे, इम्युन फंक्शन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
अंडी
अंडी उकडून खाल्ल्याने त्यातील प्रोटीन पचायला सोपे जाते. अनेकजण कच्चे अंडे अथवा फ्राय करून खातात मात्र ते उकडून खाणे चांगले असते.
गाजर
अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की गाजर उकडल्याने त्यातील सेल वॉल तुटून जातात यामुळे शरीरातील बीटा कॅरोटीन शोषून घेणे सोपे जाते.