
मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यनने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो बॉक्स ऑफिसचा चॅम्पियन आहे. अभिनेत्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हा सिनेमा रिलीज होण्याआधी या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सिनेमाची सुरूवात जरी मंद राहिली असली तरी वीकेंडला त्याने वेग गाठला आहे. शनिवारी सिनेमाने दमदार कलेक्शन केले होते. जाणून घ्या चंदू चॅम्पियनने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी किती कोटींची कमाई केली..
या सिनेमाची कहाणी हृदयाला भिडणारी अशीच आहे तसेच कार्तिक आर्यननेही यात कमाल अभिनय केला आहे. हा सिनेमा भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चंदू चॅम्पियनने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५.४० कोटींचे कलेक्शन केले होते. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ७.७० कोटी रूपये कमावले.
रिपोर्टनुसार चंदू चॅम्पियनने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १० कोटींचे कलेक्शन केले आहे. यासोबतच चंदू चॅम्पियनने तीन दिवसांत एकूण २३.१० कोटी रूपये कमावले आहेत.