Sunday, April 20, 2025
Homeमहत्वाची बातमीVidhansabha Election : विधानसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात दोन प्रभारींची नियुक्ती

Vidhansabha Election : विधानसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात दोन प्रभारींची नियुक्ती

केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी (Political parties) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपकडून (BJP) दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तर अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर सहप्रभारी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा हे प्रभारी आढावा घेणार आहेत.

भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व भाजपच्या नेत्यांवर नाराज आहे. अशावेळी राज्यात भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. उद्या भाजपची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीतच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -