Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडी

Air India: एअर इंडियाच्या विमानात जेवणात आढळले ब्लेड, सोशल मीडियावर व्हायरल

Air India: एअर इंडियाच्या विमानात जेवणात आढळले ब्लेड, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: रेल्वे आणि विमानात मिळणाऱ्या जेवणाबाबत सातत्याने अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशीच काहीशी घटना एअर इंडियाच्या विमानात घडली आङे. येथे एका प्रवाशाच्या जेवणात ब्लेड आढळले.


एअर इंडियाची ही फ्लाईट बंगळुरू येथून सॅन फ्रान्सिस्को येथे जात होती. हे ब्लेड जेवणात लपलेले होते. दरम्यान, तोडांत काहीतरी वेगळेच जाणवल्यानंतर त्याने ते थुंकले असता ब्लेडचा तुकडा आढळला. दरम्यान, प्रवाशाला कोणतीही दुखापत झालेली नाही.



खाण्यात होता मेटलचा तुकडा


हा प्रवासी मॅथ्यूरेस पॉलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेची माहिती दिली. सोबतच याचा फोटोही पोस्ट केला. त्यांनी सांगितले एअर इंडियाच्या जेवणामुळे तुम्हाला दुखापत पोहोचू शकते. त्यांना विमानात जेवणासाठी म्हणून रोस्टेड पटेटो आणि फिग चाट मिळाले होते. यात एक मेटल पीस आढळला. हा तुकडा ब्लेडसारखा होता. जेवण चावत असताना त्यांना हे आढळले. देवाची कृपा की मला कोणतीही दुखापत झाली नाही. अशा घटना एअर इंडियाच्या प्रतिमेला धोका पोहोचवू शकतात. जर हे कोणी मुलाने खाल्ले असते तर मेडिकल इर्मजन्सी निर्माण झाली असती.


 


एअर इंडियाने प्रवाशाची मागितली माफी


एअर इंडियाने या ट्वीटवर तातडीने प्रतिक्रिया देताना लिहिले की आम्हाला हे जाणून दुख: पोहोचले आहे. अशी सेवा कोणत्याही प्रवाशाला दिली नाही पाहिजे. कृपया तुम्ही सीट नंबर आणि बुकिंग डिटेल्स शेअर करा. हा मेटलचा तुकडा भाज्या कापणाऱ्या मशीनचा आहे. याबाबत एअर इंडियाने माफी मागितली आहे.

Comments
Add Comment