Friday, October 4, 2024
Homeराशिभविष्यWeekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ जून २०२४

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ जून २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ जून २०२४

काम वाढणार आहे

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहे. त्यामुळे धावपळही वाढणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांना काम खूप वाढणार आहे, त्यामुळे परिवाराकडे लक्ष कमी दिले जाईल. यामुळे घरातील वातावरण आपणास चांगले ठेवावेच लागेल. घरातील व्यक्ती नाराज असतील. कुटुंबातील व्यक्तींना खूश करण्यासाठी एखाद्या छोट्या-मोठ्या सहलीचे आयोजन कराल. प्रकृती स्वास्थ्याकडे चांगले लक्ष दिल्यामुळे प्रकृती नीट असेल. प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही. नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्यापासून दक्ष राहणे, कुठल्याही परिस्थितीत भावनांचा विचार करणे आवश्यक आहे.

जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार

वृषभ : या कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ-बहीण यांच्या संबंधात काही गोष्टींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपणावर सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये प्रवासाची शक्यता आहे. प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेणे. स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले. कोणाशी वाद होऊ देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता.

पारदर्शकता ठेवा

मिथुन : आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी आपला बराच खर्च होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळप्रसंग पडल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट आहे त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी, तरच त्यांना चांगले लाभ होऊ शकतात. शेअर मार्केटमधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत. त्या दृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने त्याचा त्यांना चांगला लाभ होईल.

 चांगले बदल

कर्क : आपल्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनशैलीतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महिलांचे आपल्या जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. वाद-विवादापेक्षा बसून चर्चा करून आपले प्रश्न सोडवा. सामंजस्याने प्रश्न सोडवा अन्यथा आपल्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळताना सावध असावे. छोट्या-मोठ्या जखमा होऊ शकतील. त्यामुळे सावध असावे. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणात पडू नये.प्रेमिकांना हा कालावधी चांगला.

नवीन संधी प्राप्त होतील

सिंह : आपल्या जिद्दीने आपण सफलता मिळवणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. जे जातक नोकरी करत आहेत त्यांना सुद्धा नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश मिळणार आहे. शिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू राहील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होणार आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आपला मित्रपरिवार वाढणार आहे. मित्रमंडळींबरोबर मनोरंजन आणि आनंद वाढवण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.

वादविवाद टाळा

कन्या : व्यापार व्यवसायात आपले जे उत्पादन आहे त्या क्वाॅलिटीपेक्षा चांगल्या क्वाॅलिटीचे प्रोडक्शन बाहेर लोकांना मिळाल्यामुळे, आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. तसेच प्रेम प्रकरणापासून दूरच राहावे, अन्यथा लव पार्टनरबरोबर आपले वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मनामध्ये संशयाचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मानसिकरीत्या तणावात राहाल. गर्भवती स्त्रियांनी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.

 मंगलकार्याचे आयोजन

तूळ : आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात मंगलकार्याचे आयोजन होणार आहे.व्यापार व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या कंपनीची आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठी मशिनरी खरेदी करण्याची आवश्यकता पडू शकते. म्हणजेच गुंतवणूक वाढणार आहे. प्रेमी-प्रेमिकांना हा कालावधी चांगला आहे. आपला जोडीदार उच्च घराण्यातील आणि श्रीमंत असू शकतो. हे प्रेम प्रकरण पुढे विवाहात रूपांतर होऊ शकते. प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडे थकल्यासारखे वाटेल. प्रोग्रॅम बनवाल. खेळाडू व्यक्तींचे खेळ चांगले होतील.

 रागावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक : काही अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये शेअर मार्केटपासून आपण लांबच राहावे. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आपण जर नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा असल्यास, हा विचार काही कालावधीसाठी स्थगित करणे लाभकारक आहे. व्यापार व्यवसायामध्ये दिलेल्या कालावधीमध्येच आपले काम पूर्ण करावे. सकारात्मक विचार व आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

प्रयत्न करणे आवश्यक

धनु : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश येण्यासाठी आपणास जास्त कष्ट घेणे, जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेच ग्रहमान आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करा अन्यथा करूच नये. त्यातल्या त्यात शेअर बाजारासाठी तर गुंतवणूक करूच नये. ज्यांना आपली प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर द्यायची आहे त्यांनी घर किंवा दुकान याच्या लिखापढी नीट कराव्यात, कागदपत्रे नीट करावीत. नियम आणि अटी यांचे पालन काटेकोरपणाने करावे. गुंतवणूक सोन्यामध्ये कराल.

कार्यक्षेत्रात लक्ष द्यावे

मकर : आपण आपले राहणीमान उंचवण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च कराल. या कालावधीमध्ये आपले घराचे स्वप्न किंवा दुकानाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. हे बजेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यापार व्यवसायामध्ये काही नवीन संधी आपणास उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आपल्या कार्यक्षेत्रात आपणास पूर्ण लक्ष द्यावे लागणार आहे. सहकाऱ्यांसोबत छोटेसे वाद-विवाद मोठे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या प्रमाणात मात्र वाढ होणार आहे. आपल्या जिद्दीने व चिकाटीने यश प्राप्त कराल.

 कार्यक्षेत्र वाढवण्याची संधी

कुंभ : आपण जर कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था नावारूपाला येईल, प्रसिद्धी पावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जर विचार केला तर हा कालावधी आपणास बढतीसाठी चांगला आहे. किंवा पगार वाढ होऊ शकते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापार व्यवसायिकांना आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगली संधी आहे. या कालावधीमध्ये आपण घर खरेदी किंवा वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये पडू नये. कौटुंबिक स्तरावर आपली द्विधा मनस्थिती राहील. कुटुंबात थोडेसे वातावरण तणावपूर्णक राहील. मन शांत ठेवून व आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्या.

 ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल                                              

मीन : आपण सोशल मीडियावर सारखा भाग घ्याल. आपले वैवाहिक जीवन चांगले असेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा चांगली असेल. आपण जर एकटे असाल, तर आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. आपले आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे. आपले प्रकृती स्वास्थ्य चांगले असले तरीही आपल्याला दक्षता घेणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांबरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात. कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -