Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Nashik Crime : भयानक! नाशिकच्या मंदिर परिसरात सापडली कवट्या आणि हाडे

Nashik Crime : भयानक! नाशिकच्या मंदिर परिसरात सापडली कवट्या आणि हाडे

अघोरी प्रकाराने उडाली खळबळ


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) पंचवटी शहरातून एक अत्यंत भयानक आणि अघोरी प्रकार (Superstition) समोर आला आहे. मंदिराच्या पवित्र परिसरात एका पोत्यामध्ये मानवी कवट्या आणि हाडे (Human skulls and bones) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचवटीमधील एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवट्या मिळाल्यानंतर लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली. ही माहिती मिळताच पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. त्यांनी या गोण्या ताब्यात घेतल्या असून ते याचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, ही हाडे आणि कवट्या प्लास्टिकचे असल्याचे समजल्याने नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आली. सदर गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली असून मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्या, तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती. तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.


पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुज्यार्‍याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे व कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समजले. मात्र मंदिराजवळ हे सर्व गोणीत कोणी ठेवले किंवा कोणी आणल्या याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परिसरातील नागरिकांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमका काय प्रकार होता, हे कळू शकेल. तर पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.

Comments
Add Comment