Sunday, July 14, 2024
Homeटी-२० विश्वचषकTeam India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले...पाहा कोणाचे रंगणार सामने

Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले…पाहा कोणाचे रंगणार सामने

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८चे सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक सेट झाले आहे.

सुपर ८मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमधून भारतासोबत यूएसएनेही सुपर ८साठी क्वालिफाय केले आहे. भारताचा सुपर ८मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बारबाडोस येथे २० जूनला खेळवला जाईल.

भारतीय संघ सुपर ८मधील सर्व सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळेल. त्यांचा दुसरा सामना २२ जूनला आहे. हा सामना अँटिग्वा येथे होईल. येथे त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. मात्र हा संघ अद्याप ठरलेला नाही. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना सेंट लूसियामध्ये २४ तारखेला खेळवला जाईल.

सुपर ८चे सामने नसणार सोपे

जर भारताचे सुपर८मधील सामने पाहिले तर त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. अफगाणिस्तानचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप सामन्यांमध्ये न्यूझीलंडलाही हरवले. दरम्यान, टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. भारताचा एक सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया संघही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -