Monday, October 27, 2025
Happy Diwali

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा....

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा....

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व पालक वृद हे हसत खेळत मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चौरढे मराठी येथे आज नवा गताचा मेळावा साकारण्यात आला. मेळाव्याची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय चोरढे येथून करण्यात आली. नवीन दाखल पात्र सर्व 11 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच एक विद्यार्थी जादा दाखल झाला.

दाखल पात्र सर्व विद्यार्थ्यांची दोन घोडा गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच लेझीम पथकात सर्व विद्यार्थी सामील झाले होते. काही विद्यार्थी लाटीकाटीचे प्रात्यक्षिक करत होते. खालूबाज्या व इतर वाद्य वृंदाच्या साह्याने पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण 130 पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. वाद्यवृंदाच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांसमवेत पालक सुद्धा नाचत होते.विदयार्थ्यांनी फटाके वाजवून नवागताचे स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर शाळेचे अध्यक्ष, सरपंच, व सौ सविता वाडकर जिल्हा परिषद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यानंतर पालक सभा घेण्यात आली. पालक सभेला सर्व पालक उपस्थित होते. शाळा प्रवेशाचा पहिला मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. पहिला दिवस म्हणून मुलांना गोड खाऊ म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले. पालकां तर्फे मंगळवारी परसबाग तयार करण्याचे ठरवण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी सौं. सविता वाडकर, चेतन पाटील, सरपंच तृप्ती घाग, अध्यक्ष सुरेश ताबडे, सुनील घाग, अनिल चोरढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक संगीता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, प्रतिभा वर्तक, जयश्री पंची यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा