
गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा
मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे महत्त्वाचे असते. देशभरात गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. दरम्यान पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Scheme) अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. त्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. आताही पोस्टाने गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळणार असल्याचा दावा पोस्टाकडून करण्यात आला आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र (KVP) ही पोस्टाची लोकप्रिय योजना आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवे तितके पैसे गुंतवू शकणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना परतावा देखील मिळणार आहे. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते.
योजनेत मिळणार इतका व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते.
५ लाख रुपये गुंतवा १० लाख रुपये मिळवा
जर तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच ११५ महिने या योजनेत पैसे ठेवले तर ७.५ टक्के व्याजाच्या आधारे ५ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर १० लाख रुपये मिळतील. त्यामुळे या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.