Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकाव्यरंग : असा कसा पाऊस

काव्यरंग : असा कसा पाऊस

जेव्हा उन्हाच्या तप्त झळा
झोंबू लागतात अंगाला
तेव्हा कोरडा पडतो गळा
अन नको नको असा वाटतो उन्हाळा
उन्हाळ्यात तहानेने जीव व्याकुळ होतो
पावसाळ्याची स्मृती मनी जागवितो
पावसाळ्यात वारा थंडगार वाहतो
पावसासोबत धरेला बिलगतो
पाऊस वाळलेल्या रुक्षलवेलिना संजीवनी देतो
सप्तरंग घेऊन गर्वाने मिरवतो
पक्षी प्राणी रुक्षे
स्वागत करतात पावसाचे
मनस्वी व्हावी मनाची मशागत स्वप्न त्यांचे
पाऊस मानव प्राणी निसर्ग यांच्याशी खेळ खेळतो
वेधशाळेचे भाकीतही तो नकळत फोल ठरवितो
तरीही मानव पावसाचा हात हाती घेतो
शतजन्माची नाळ त्याची आपली कवी सांगतो
खरंच मला ना कळे असा कसा पाऊस अल्लड वेंधळा
जो चालवी अविरत इमाने इतबारे जगाची शाळा

– सूर्यकांत आंगणे, मुंबई

आभाळाचं काळीज

गोजिऱ्या स्वप्नांनी
लगडलेल्या जीवनाचा
भक्कम आधारस्तंभ
म्हणजे बाबा…

उन्हा पावसात
सावली बनून जपणारा
लेकरांचा वटवृक्ष
म्हणजे बाबा…

आई एवढाच
मायेने आकंठ भरलेला
प्रेमाचा झरा
म्हणजे बाबा…

लेकरांचा संकटात
पहाड होऊन लढणारी ढाल
म्हणजे बाबा…

सारी दुःख
स्वतः झेलून ओठांवर
हसू पेरणारा अवलिया
म्हणजे बाबा…

लेकारांच्या चुका
उदरात दडवून पोसणारा
आभाळाचं काळीज
म्हणजे बाबा…

– राजश्री बोहरा, डोंबिवली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -