
मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी झालेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नामिबियाला डीएस नियमानुसार विजयासाठी १० षटकांत १२६ धावा करायच्या करायच्या होत्या. मात्र त्यांनी तीन विकेट गमावत केवळ ८४ धावा केल्या.
यासोबतच इंग्लंडचा नामिबियावर विजय साकारला गेला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे सुपर ८मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कायम आहे. आता जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरवले तर इंग्लंडचा संघ सुपर ८मध्ये पोहोचेल. मात्र जर स्कॉटलंडने कमाल करत ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सुपर ८मध्ये पोहोचतील. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर ८मध्ये पोहोचला आहे.
हॅरी ब्रूकची तुफानी खेळी
इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशातच हा सामना १०-१० षटकांचा होऊ शकला. इंग्लंडने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत पाच बाद १२२ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २० षटकांत नाबाद ४७ धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने १८ बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली.