मिरचीपुराण : कविता आणि काव्यकोडी

वावरातून आले थेट
मी घरची ना दारची
मी लवंगी मिरची
आहे कोल्हापूरची


घरच्या घरी वाळवून
कुटून ठेवतात मला
तिखट हवं तेव्हा
मग येते मी कामाला


खात्री देत नाही मी
विकतच्या मसाल्याची
पोट बिघडलं तुमचं की
बोलणी आम्ही खायची


भाजीत माझा नेहमी
उपयोग होतो खास
माझा बनवलेला ठेचा
झणझणीत झकास


आधी असते हिरवी
नंतर होते लाल
जपून खा मला
नाही तर होतील हाल


जहाल म्हणूनच मला
ओळखतो सारा गाव
मिठासोबत माझेच
अहो, घेतात सारे नाव



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कच्च्याची लागते
आंबट फोड
पिकल्यावर होतो
मधुर गोड


रस याचा पिऊन
एकदा तरी पाहा
फळांचा राजा
कोण बरं हा?


२) पाय याचे बारीक
डोक्यावर तुरा
पावसाला झेलून
तो फुलवी पिसारा


नाच त्याचा पाहून
रान सारे डोले
म्याओ म्याओ करून
कोण बरं बोले?


३) गरगर फिरून
दमत कसे नाही
स्वतःसोबत इतरांना
पळवत राही


तीन चमचे बारा वाट्या
त्याच्याकडे असे
वेळेचा हिशोब
कोण सांगताना दिसे?



उत्तर -


१)आंबा


२) मोर


३) घड्याळ

Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा