मुंबई: प्रवासादरम्यान हा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो की ज्या गाडीत ते बसले आहेत तिथे सर्वात सुरक्षित जागा कोणती आहे. आज जाणून घेऊया की कार, ट्रेन, बस आणि विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित मानली जाते.
कारमधील सुरक्षित सीट
जर तुम्ही एखाद्या ७ सीटर कारमध्ये प्रवास करत आहात तर सर्वात पुढची अथवा मागची नव्हे तर मधली सीट ही नेहमी सुरक्षित मानली जाते. जेव्हा तुम्ही लहान कारमध्ये बसला तेव्हा ही मधली सीट ही सुरक्षित मानली जाते.
बसमधील सुरक्षित सीट
जर तुम्ही बसमधून प्रवास करत आहात तर प्रयत्न करा की ३० ते ३५ नंबरची सीट घ्या. म्हणजेच जी सीट मधल्या टायरच्या वरती असते ती. ही सीट सर्वात सुरक्षित मानली जाते. जर तुम्ही बसमध्ये या सीटवर असाल तर अपघातावेळेस तुम्ही जखमी होण्याची शक्यता इतर प्रवाशांच्या तुलनेत कमी होते.
रेल्वेमधील सुरक्षित सीट
जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर दोन गोष्टी लक्षात घ्या. मधल्या डब्यातून प्रवास करा. दुसरा हा की मधल्या डब्यातील मधल्या जागा बुक करा. मधली सीटमध्ये मिडल बर्थ नव्हे. मधली सीट म्हणजे ३३ ते ३५ नंबरच्या सीट.
विमानात कोणती सीट सुरक्षित
विमानात हे चित्र वेगळे असते. एकीकडे जिथे कार, बस आणि ट्रेनमध्ये सर्वात सुरक्षित सीट मधली मानली जाते. तर विमानात सर्वात सुरक्षित सीट पाठची सीट असते. तज्ञांच्या मते विमानात मागे बसलेल्या प्रवाशांची सुरक्षा इतर प्रवाशांच्या तुलनेने ४० टक्के अधिक असते. कारण विमानाला अपघात झाल्यास मागील बाजूने निघणे सोपे असते. तसेच मागचा भाग इंजिनपासून दूर अल्याने तिथे धोका कमी असतो.