Badrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच मृत्यू

बसमधून १७ जण करत होते प्रवास


डेहराडून : उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथच्या (Badrinath accident) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेऊन जात असलेल्या मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने बस अलकनंदा नदीत (Alaknanda river) कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये १७ प्रवासी होते, अशी माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली. नोएडातून हे भाविक बद्रीनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. श्रीनगर येथून बद्रीनाथ महामार्गावरुन जात असताना रुद्रप्रयाग येथे हा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेक्स्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने महत्प्रयासाने या अपघातग्रस्त वाहनातून भाविकांची सुटका केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.





उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या भीषण अपघाताचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. "रुद्रप्रयाग येथीस घटना अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत", असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.




Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान