Shinde vs Thackeray : ठाण्याची जागा गेल्याने उबाठाला मोठं भगदाड! माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जास्त जागा मिळाल्या तर महायुतीला (Mahayuti) तुलनेने कमी जागा मिळाल्या. असं असलं तरी ठाकरे गटातून (Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कमी व्हायचे नाव घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात (Thane) उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उमेदवाराचा सहज पराभव झाला. या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.


दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाण्यामधून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश पार पडल्यामुळे तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरत यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी नेते यावेळी उपस्थित होते. मीरा भाईंदर शहरात आणखी दोन माजी नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक विश्वासू शिलेदार ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने

बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने

PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत