Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याअंतर्गत ४००हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची संपूर्ण देशभर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



पदाचे नाव व रिक्त जागा


१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४



शैक्षणिक पात्रता



  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA.

  •  GATE २०२४ परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी.



अर्ज फी



  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.


वेतन


४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


https://careers.powergrid.in/recruitment-nextgen


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


http://www.powergrid.in

Comments
Add Comment