Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली! मेदांता रुग्णालयात केलं दाखल

Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली! मेदांता रुग्णालयात केलं दाखल

पाटणा : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री आणि एनडीए सरकामधील (NDA Government) जदयू (JDU) पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) उपचार घेत आहेत. आज सकाळी नितीश कुमार यांचा हात दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागात त्यांची तपासणी करण्यात आली.


लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात त्यांनी आराम केला नव्हता. शिवाय प्रचारासाठीच्या धावपळीमुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे. नितीश कुमार यांच्या दैनंदिन कार्यक्रमात मागील काही दिवसांपासून वाढ झाली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक प्रचार दौरे केले होते. तर दिल्लीत एनडीए सरकार स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या सर्व कारणामुळे नितीश कुमार यांनी पुरेसा आराम केला नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खालावली होती.


बिहारमधील भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर नितीश कुमार अस्वस्थ झाले होते. सुशीलकुमार मोदी यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते जाऊ शकले नव्हते. नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील ते गेले नव्हते. तर, काही ठिकाणी निवडणुकीतील प्रचाराचे कार्यक्रम देखील नितीश कुमार यांनी रद्द केले होते. अशा धावपळीतच त्यांचा हात अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment