मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेची भांडी ठेवणे शुभ मानले गेले आहे. पितळ अनेक गोष्टीत लाभ देतात. पितळ हा धातू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. पितळेची भांडी घरात असल्यास लक्ष्मी मातेची कृपा राहते.
लक्ष्मी मातेच्या कृपेने घरात भरभराट होते. आर्थिक समस्या दूर होतात. दरम्यान, घरात पितळेची भांडी ठेवल्याने एक चूक आपल्याला त्रासदायक ठरू शकते.
वास्तुशास्त्रानुसार पितळेची भांडी कधीही बंद अथवा अंधाऱ्या ठिकाणी ठेवू नयेत. जर ही चूक कोणाकडून होत असेल तर त्याच्या जीवनात समस्या येऊ शकतात.
पितळेची भांडी अंधाऱ्या खोलीत ठेवल्याने शनी दोष सुरू होऊ शकतो. या कारणामुळे संकटे चारही बाजूंनी घेरू लागतात.
शनी दोष सुरू झाल्याने घरात आर्थिक समस्या वाढू लागतात. कुटुंबात शांतता राहत नाही. यासोबतच घरात नकारात्मक उर्जेचा वास राहतो आणि सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते.