
मुंबई: एका स्मार्टफोनमध्ये जर तुम्ही दोन सिम(sim card) वापरत असाल तर मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, सरकार एका फोनमध्ये दोन सिम चालवल्यास दंड करण्याचा निर्णय घेत आहे. एका रिपोर्टनुसार दूरसंचार नियामकने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की नंबरांचा दुरूपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.
नियामकनुसार असे अनेक युजर्स आहेत ज्यांनी आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवले आहेत मात्र एकाचाच वापर करत आहे. नियामकाच्या म्हणण्यानुसार मोबाईल नंबर ही सरकारची संपत्ती आहे. याला एका मर्यादेपर्यंत दिले जाते. सरकार सिम कार्डच्या बदल्यास शुल्क वसूल करू शकते.
हे सिम कार्ड्स बंद करण्याच्या तयारीत
Traiच्या आकड्यानुसार मोबाईल ऑपरेटर आपला युजरबेस गमावू नये यासाठी जे सिम कार्ड वापरात नाहीत ते बंद करण्याच्या तयारीत आहे. नियमांनुसार जर एखाद्या युजरने सिमकार्ड बराच काळ रिचार्ज केले नाही तर ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सुविधा आहे.
अशातच traiकडून मोबाईल ऑपरेटरवर दंड ठोठावला जाऊ शकतो. आकड्यांनुसार सध्याच्या काळात २१९.१४ मिलियनहून अधिक मोबाईल नंबर्सना ब्लॅकलिस्ट करण्याच्या तयारीत आहे जे बराच काळ वापरले जात नाही आहेत.
या देशांमध्ये मोबाईल नंबरसाठी लागतात पैसे
ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलँड, युके, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बुल्गारिया, कुवैत, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, पोलंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क सारख्या देशांमध्ये टेलिकॉम कंपन्या चार्ज घेतात.