Sikkim rain : सिक्कीममध्ये पावसाचे थैमान! भूस्खलनामुळे ९ लोकांचा मृत्यू

मूलभूत सुविधा देण्यासाठी सिक्कीम सरकारचे अथक प्रयत्न सुरु


गंगटोक : सध्या देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून काही राज्यांना पावसाने (Heavy rainfall) झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही जिल्ह्यांना अद्याप दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे सिक्कीममध्ये (Sikkim rain) काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे त्या ठिकाणी भूस्खलनाची (Landslide) घटना घडली असून यातील मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. काल सायंकाळपर्यंत सिक्कीममध्ये आलेले सुमारे २,००० हजार पर्यटक यात अडकले होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


सिक्कीममध्ये सर्वात उत्तरेकडील प्रदेश मंगन जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, उत्तर सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात साधारण २२० मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाला. मात्र त्याचवेळी सततच्या पावसानंतर सिक्कीममधील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.


सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागातील घरांची पडझड देखील झाली आहे. दक्षिण सिक्कीममधील दमथांग तसेच पश्चिम सिक्कीममधील ग्लालशिंग आणि गंगटोक यासारख्या अनेक भागात १३ दिवसांच्या कालावधीत ३० मिमी ते ५० मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. IMD नुसार, यावर्षी १३ दिवसांत तब्बल २५० मिमी पावसाची (Monsoon) नोंद झाली. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.



सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी काय पावले उचलली?


मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीम मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेनंतर निवेदन जारी केले होते. त्यात सिक्कीममध्ये सरकारने मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा शपथविधी काही दिवसांपूर्वी पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग म्हणाले की, 'पिडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचे अथक प्रयत्न केले जात आहेत.


Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला