Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीDigital Display : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पश्चिम रेल्वेकडून मिळणार 'ही' खास सुविधा

Digital Display : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पश्चिम रेल्वेकडून मिळणार ‘ही’ खास सुविधा

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल (Mumbai Local) प्रवाशांच्या सेवेसाठी सतत नवनवीन सुविधा देत असते. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आनंदाची माहिती दिली आहे. अनेक लोकांचे गणित लोकलवर अवलंबून असते. लोकल चुकली किंवा लोकल उशीरा आली की त्यांचे संपूर्ण वेळापत्रक बिघडते. काहीवेळा लोकल प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवर चुकीची माहिती देण्यात येते. यावेळी प्रवाशांची तारांबळ उडते. या कारणांवर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांसाठी खास सुविधा आणली आहे. यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून नेहमीच उपाययोजना आखल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वे आता लोकलवर एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे डिजिटल डिस्प्ले (Digital Display) बसवणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती व किती डब्ब्यांची आहे हे प्रवाशांना समजणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर डिजीटल डिस्प्लेचा प्रयोग केला जाणार आहे.

लोकलवर डिजिटल डिस्प्ले बसवणार

मुंबई सेंट्रलच्या पश्चिम रेल्वे ईएमयू (EMU) कारशेडमध्ये एक नवीन हेड कोड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना लोकल ट्रेन कुठे चालली आहे. किती डब्ब्यांची आहे तसेच स्लो आहे की फास्ट याची सर्व माहिती मिळणार आहे. या डिस्प्लेचे वैशिष्ट्य म्हणजे गार्ड सुरुवातीच्या स्थानकातच लोकलचा नंबर टाकण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना त्या लोकलबद्दल आणि प्रवासाविषयी सर्व माहिती लोकलच्या डब्यावर असलेल्या डिस्प्लेवर कळणार आहे. डिजिटील डिस्प्ले ३ सेकंदाच्या अंतराने मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लोकलची माहिती सांगेल.

एचडी स्वरुपातील डिस्प्ले

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, डिजीटल डिस्प्ले एचडी स्वरुपात आहे. या डिस्प्लेवर काच लावण्यात आली आहे. प्रवाशांना स्क्रीनवर हा कोड सहज बघता येईल. त्याचबरोबर या डिस्प्लेवरील अक्षरे देखील ठळक आहेत जी ५ मीटरपर्यंतच्या अंतरावरुनही दिसून येतील. सध्या एका रेकमध्ये डिस्प्ले सिस्टिम बसवण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक बाजूला चार डिजीटल डिस्प्ले असलेले एकूण आठ डिजीटल डिस्प्ले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील नागरिकांना या डिस्प्लेचा मोठा फायदा होणार आहे व कोणाचीही मदत न घेता सहज रेल्वेबाबतीत सर्व माहिती मिळू शकणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -