WI vs NZ: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर धमाकेदार विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) २६व्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर धमाकेदार १३ धावांनी विजय मिळवला आहे. शेरफन रूदरफोर्डच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंड्च्या संघाला याचा पाठलाग करताना ९ बाद १३६ इतक्या धावा करता आल्या.


न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने ४० धावा करत सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याला इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने न्यूझीलंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले.


याआधी पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची अवस्था एकेकाळी ५८ धावांत ६ बळी गमावले होते. मात्र हळू हळू त्यांनी डाव सावरला. रुदरफोर्डने एक बाजू लावून धरली आणि संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. पहिल्या टप्प्यातील तसेच मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर रुदरफोर्डने खालच्या फळीतील फलंदाजांना साथीला घेत वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.


दुसरीकडे न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनंतर मिचेल सँटनरने न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र या आशा फोल ठरल्या आणि वेस्ट इंडिजचा १३ धावांनी विजय झाला.


Comments
Add Comment

India vs England : टीम इंडियासमोर इंग्लंडचे ३८८ धावांचे कठीण आव्हान

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक

Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सध्या लंडनच्या

Ind vs Eng : भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल! जसप्रीत बुमराह संघातून बाहेर; नेमकं कारण काय ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा आनंद लुटता यावा म्हणून केरळ सरकारने घेतला थेट 'हा' निर्णय 

केरळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा परिणाम केरळवरही

FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यात अर्जेंटिना-स्पेन आमने सामने; ९६ वर्षांनंतर स्पॅनिश भाषिक देशांमध्ये ऐतिहासिक फायनल सामना

न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. हा सामना केवळ

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले