Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

MNS : लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पण विधानसभेला मनसे लढणार स्वबळावर?

MNS : लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पण विधानसभेला मनसे लढणार स्वबळावर?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांना (Political Parties) विधानसभा निवडणुकीचे (Vishan Sabha Election) वेध लागले आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी 'एकला चलो रा' चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यासाठी त्यांनी २००-२५० जागांची तयारी सुरु केली आहे.


आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची करणार चाचपणी करणार असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी मनसेकडून फायनल केली जाणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यांपैकी २००-२५० जागा मनसे लढवणार असल्याची शक्यता आहे.


मनसेला या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनसेने चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment