Saturday, July 6, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी...

पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. तर डॉ. पीके मिश्रा यांना पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान म्हटले जाणारे अजित डोवाल १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी प्रमुख असलेले डोवाल ३१ मे २०२४ला पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले होते.

खरंतर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतात. यांचे प्रमुख काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे असते. एनएसएचे हे पद पहिल्यांदा १९९८मध्ये बनवण्यात आले होते जेव्हा देशात दुसऱ्यांदा आण्विक चाचणी करण्यात आली होती. सरकारमध्ये हे पद खूप महत्त्वाचे असते.

मग ते ३७० असो, सर्जिकल स्ट्राईक असो, डोकलाम असो वा राजकीय निर्णय डोवाल हे देशांच्या आशांवर नेहमीच खरे उतरले आहेत. पुलवामाचा बदला तर पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हा निर्णय डोवाल यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता.

डोवाल १९७२मध्ये इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सामील झाले होते. आपल्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ ७ वर्षे पोलीसांची वर्दी घातली कारण डोवाल बराचवेळ देशाच्या गुप्तहेर विभागात काम करत होते. यामुळेच त्यांचे करिअरही तितकेच अनोखे होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -