आधी गळा आवळला.. कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला अन्…
वर्धा : आष्टी तालुक्यात वडील मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा नदीपात्रालगत गेलेल्या पायवाटीजवळ मृतदेह आढळून आला होता. त्याबबातीत पोलिसांनी कडक तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणाबाबत मोठा खुलासा झाला आहे. या खुलास्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी वर्धा नदीजवळ एक मृतदेह आढळून आला होता. बाबाराव पारिसे असे त्या मृतक व्यक्तीचे नाव असून त्याच्या मारेकरीबाबत पोलिसांचा कडक तपास सुरु होता. तपासादरम्यान बाबाराव यांची हत्या त्यांच्या पोटच्या मुलानेच केली असल्याचे उघडकीस आले. २७ मे रोजी बाबाराव पारिसे हे रिचार्ज करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या मुलाने मेहुण्याच्या मदतीने धारदार शस्त्राने हल्ला करुन वडीलांची निर्घृण हत्या केली. हत्याकांडानंतर मृतदेह वर्धा नदीजवळ फेकून दोन्ही आरोपींनी पळ काढला होता.
हत्याकांडाचे धक्कादायक कारण उघडकीस
आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृतक बाबारावची मुलाच्या व मुलाच्या मेहुण्याच्या पत्नीवर वाईट नजर होती. याच कारणातून मृतक व मारेकऱ्यांमध्ये नेहमी खटके उडत होते. ज्यादिवशी हत्येचा कट रचला त्यादिवशी दुपारी या कारणातून वाद झाला होता. अखेर संतप्त मुलाने त्याच्या मेहुण्याच्या मदतीने वडील बाबारावची हत्या केली. बाबाराव पारिसे हे रिचार्ज करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांचा गळा आवळून चाकूने वार केला त्यानंतर कुऱ्हाडीने डोक्यावर जबर मार देऊन त्यांनी हत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून कडक कारवाई ठोठावली आहे. मात्र वडील मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.