Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai crime : धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट!

Mumbai crime : धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट!

मुंबईच्या मालाडमधील खळबळजनक घटना

मुंबई : ऑनलाईन ऑर्डर (Online order) केलेल्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, किंवा काहीतरी चूक असणे यात आता काही नवीन राहिलं नाही. अशा अनेक तक्रारी येत असतात. मात्र, मुंबईच्या मालाडमधून (Mumbai crime) याच ऑनलाईन ऑर्डरप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिमच्या कोनमध्ये (Ice cream cone) चक्क माणसाच्या तुटलेल्या बोटाचा तुकडा आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्लेम ब्रेंडेन सेराओ (वय २७) या नावाच्या व्यक्तीने काल १२ जूनला ऑनलाइन डिलिव्हरी अॅपद्वारे आइस्क्रिमची ऑर्डर दिली होती. त्याने आईस्क्रिमचे तीन कोन मागवले होते. त्यापैकी एका आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं. या व्यक्तीने यम्मो कंपनीचं (EMOI) बटस्कॉच फ्लेव्हरचे आईस्क्रिम मागवले होते. त्याने आईस्क्रीमच्या बॉक्सचे झाकण उघडताच त्याला बोट दिसले. त्यानं हे बोट बाहेर काढले. जवळपास २ सेमी लांबीच्या बोटाचा तुकडा दिसला. या घटनेमुळे ऑनलाईन कोणतीही गोष्ट मागवणे आता असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.

ऑर्लेम ब्रेंडन सेराओ हे एमबीबीएस डॉक्टर (MBBS doctor) आहेत. त्यामुळे त्यांना आइस्क्रिममध्ये असलेले बोट माणसाचेच असल्याचे लगेच समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपासणी करत आहे. आईस्क्रीममध्ये आढळलेल्या बोटाचा तुकडा प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हे आईस्क्रीम कुठे बनवले जाते, कुठे पॅक केले जाते, याबाबत शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -