Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीमहाराज असती ब्रह्मंडात l रक्षिती अखिल विश्वात ll

महाराज असती ब्रह्मंडात l रक्षिती अखिल विश्वात ll

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

मी ना जोशी यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव.
काही दिवसांपूर्वी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पॅरिस विमानतळावर उतरून, इंमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पूर्ण करून, मेट्रो ट्रेनमध्ये चढलो. मनातल्या मनात ‘गण गण गणात बोते’ हा जप जमेल तसा सुरू होता. बरोबर दोन सूटकेसेस आणि दोन हातात पिशव्या, पर्स असे साहित्य सोबतीला होते. गाडीत माझ्यापुढे आधी माझे पती चढले.

त्यांच्यामागे मी. पुढे बघते तर माझ्या डाव्या बाजूचा एक धष्टपुष्ट निग्रो माणूस मिस्टरांना विचित्र पद्धतीने मागे ढकलत होता. मला काही तरी विचित्र आहे, असं वाटेस्तोवर त्याच ते ढकलणं थांबलं. मग बघते तर माझ्या उजव्या बाजूला आणि मागे अजून दोन धटिंगण निग्रो होते आणि माझ्या पर्सची झिप अर्धवट उघडी होती. ती मी लगेच लावली आणि सावध झाले. उतरल्यावर माझ्या पतींनी मला सांगितले की, जे त्यांना धक्का मारत होते, त्यांनी ढकललं त्यांच्या कोटच्या आतल्या खिशात हात घातला होता; पण तेसुद्धा सावध झाले होते. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आमचे पासपोर्ट, पैसे आणि इतर सामान सुरक्षित होते. त्या बदमाश लोकांनी जर यांचे पाकीट उडविले असते, तर सगळीच गडबड झाली असती. विदेशात पासपोर्ट नाही म्हणजे तिथे राहणे, पुन्हा परत येणेसुद्धा लांबले असते. त्याकरिता किती यातायात करावी लागली असते, ते वेगळेच. विदेशात परक्या ठिकाणी आपल्याला एवढी माहितीसुद्धा नसते म्हणजेच आपल्या स्थानिक नातेवाइकांना सुद्धा सर्व कामे सोडून धावपळ करावी लागते. या सर्व गोष्टींमुळे होणारा मनस्ताप हा अतिजास्त असतो.

महाराज खरोखर धन्य आहेत. वेळेवर आम्हा दोघांना सावध करून, आमचे तसेच साहित्याचे रक्षण केले. महाराज सदैव आपल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेतात, याचा पुन्हा प्रत्यय आला.

जय श्री गजानन…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -