मुंबई: चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे शरीरात युरिक अॅसिडचा स्तर वाढू लागतो. खाण्या-पिण्याच्या गोष्टीमधून अनेकदा युरिक अॅसिडचा स्तर वाढू शकतो. युरिक अॅसिड एक प्रकारचे वेस्ट असते. जे किडनी फिल्टर करून शरीरातून बाहेर टाकते.
युरिक अॅसिड शरीरात वाढल्यास दिसतात ही लक्षणे
युरिक अॅसिडचा स्तर वाढल्यास सांधेदुखीचा त्रास, सूज तसेच हाडांचे दुखणे सुरू हते. युरिक अॅसिड वाढल्यास दही न खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही हाय फॅट असलेले दही खात आहात तर युरिक अॅसिड वाढू शकते. तज्ञांच्या मते फॅट असलेले दही खाऊ नये.
किडनीला असतो धोका
युरिक अॅसिडमुळे किडनीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. यामुळे हेल्दी डाएट घेणे सुरू केले पाहिजे. यात अधिकतर भाज्या, फळे, अख्खे धान्य आणि कमी फॅट असलेले डेअरीचे पदार्थ यांचा समावेश असतो.
शरीरात युरिक अॅसिड वाढू लागल्यास रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागते. यामुळे अनेक त्रास होऊ लागतात. युरिक अॅसिड क्रिस्टल्समध्ये रूपांतरित बोटांच्या जॉईंट्सना त्रास होऊ लागतो. याशिवाय इतर समस्याही होतात.