Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीGold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोनं चांदीच्या दरात तेजीची घसरण

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोनं चांदीच्या दरात तेजीची घसरण

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर

मुंबई : वाढत्या महागाईत सोनं चांदी दराच्या बाबतीत (Gold Silver Rate) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर जिथे ७२ हजार होता आणि चांदीचा दर लाखाच्या टप्प्यावर पोहोचला होता तिथे तेजीची घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोनं चांदीचे भाव उतरत चालल्याचे दिसून येत आहे. आज देखील चांदीच्या किमतीत २०० रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली. त्यानुसार चांदी सध्या ८८,५०० रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. त्याचबरोबर सोने ६०० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून कालच्या तुलनेत चांदी १९२१ रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन ८८,५२४ रुपये प्रति किलोवर आली आहे. तर वायदे बाजारात चांदीचा भाव ९०,५५४ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

सोने ६०० रुपयांनी स्वस्त

चांदीसोबतच वायदा बाजारात सोन्याच्या भावातही घसरण होत आहे. बुधवारी सोन्याचा भाव ७१,९७० रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर आज एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत ५८२ रुपयांनी स्वस्त होऊन ७१,३८८ रुपयांवर आले आहे.

परदेशी बाजारातही सोने-चांदी स्वस्त

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत बाजाराबरोबरच परदेशी बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही तिचे दर जास्त असल्याचे दिसून येते. अर्थव्यवस्थेला मदत होण्यासाठो आम्ही महागाई दर २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

इतर शहरातील सोनं-चांदीचे भाव

• दिल्लीत २४ कॅरेट सोने ७२,३१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९५,२०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

• चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ७२,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९५,२०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

• मुंबईत २४ कॅरेट सोने ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९०,७०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

  • पुण्यात २४५ कॅरेट सोने ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९०,७०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -