Sunday, April 20, 2025
Homeटी-२० विश्वचषकBAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

BAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. मात्र नेदरलँड्सला केवळ ८ बाद १३४ धावा करता आल्या. बांगलादेशच्या या विजयामुळे त्यांचे सुपर८मधील आव्हान कायम राहिले आहे.

नेदरलँड्सकडून सुरूवात ठीक झाली. नेदरलँड्सच्या पहिल्या पाच फलंदाजांनी थोडीफार धावसंख्या केली. मात्र खालच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले यामुळे नेदरलँड्सला केवळ १३४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

तत्पूर्वी, बांगलादेशच्या डावाची सुरूवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकांत कर्णधार नजमुल हुसैन शांतो केवळ एक धाव करून बाद झाला. शांतो बाद झाला न झाला तोच लिटन दासही एक धाव करून बाद झाला. अशातच शाकिब अल बसन आणि तनजिद हसन यांच्यात ४८ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. त्यांनी मिळून बांगलादेशची धावसंख्या ८ षटकांत ७० धावांवर पोहोचवला. मात्र ९व्या षटकांत तनजिद ३५ धावांवर बाद झाला.

ताहिदने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र तोही ९ धावा करून बाद झाला. महमदुल्लाहने मधल्या षटकांमध्ये शाकिबची साथ दिली आणि ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकांपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ४ बाद १२८ इतकी होती. १८व्या षटकांत वॅन मीकेरनने महमदुल्लाहला बाऊंड्रीकडे कॅच दिला. त्याने २५ धावा केल्या. १९व्या षटकांत बांगलादेशने १४ धावा केल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये १२ धावा आल्या. यामुळे बांगलादेशला १५९ पर्यंत धावसंख्या गाठता आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -