Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेपाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

मान्सून कालावधीत ठाणे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश

ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिले.

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ सहभागी झाले होते.

धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम पडल्यास, ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. अशा देखील सूचना या ठिकाणी पिण्याचे पाणी, विजेची सुविधा असावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली या महापालिकांचे आयुक्त, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, जलसंपदा आदी विभागाचे अधिकारी यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.

साथीच्या रोगावरील औषधांचा पुरेसा साठा ठेवा

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन, श्री. देसाई म्हणाले की, पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगर परिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेक वेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -