Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणा-या गुंडाला नागरिकांनी कोर्टातच धूतले!

‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणा-या गुंडाला नागरिकांनी कोर्टातच धूतले!

बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गुंड जयेश पुजारीला (Jayaesh Pujari) आज बेळगाव मध्ये कोर्टात आणले होते. यावेळी तो कोर्टात सातत्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देत असल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी त्याची कोर्टातच चांगलीच धुलाई केली. दरम्यान जयेश याच्यावर पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचेही आरोप आहेत. तो या प्रकरणी सध्या अटकेत आहे.

जयेश पुजारी सध्या हिंडलगा तुरुंगात आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या. जयेशच्या घोषणांनी नागरिकही संतापले आणि त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले पण यामुळे काही काळ कोर्ट परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होती..

 

View this post on Instagram

 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)

काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना जयेशने लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. तपासणीमध्ये त्याच्या पोटात वायरीचे तुकडे आढळून आले आहेत. मात्र तो ठीक आहे.

बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -